उन्हाळी चवळी लागवड|chavali lagwad techniques

         उन्हाळी चवळी लागवड



 

       शेतकरी बंधुनो सध्या कपाशी चे शेत मोकळे झाले आहे 

बर्याच शेतकरया नी रबी गहु,मका पेरला आहे आतां कमी कालावधीचे पिके घ्यावी टरबूज, खरबुज घेण्यास हरकत नाही पण 

मार्केटिंग चा प्रश्र आहे बागवान लोक माल कमी भावात मागणी करतात मार्केट मध्ये माल गेल्यावर दलाल भाव पाडतात शेतकरया ना परवडत नाही 

    उन्हाळी चवळी शेतकरया नी कपाशी च्या ठिबक वर पेरणी करावी ठिबक नळया च्या दोन्ही बाजूला एक फुटावर दुश्या पांभरीने सरी काढुन ओलऊन घ्या वे व एक ते दिड फुटाचे अंतरावर चवळी चे बियाणे टोकण करावे भाजी ची मोठी चवळी कृषि केंद्रावर मिळेल 

    पेरतांना सुपर फाॅसफेट च्या दोन गोणी टाकाव्यात किंवा 

10/26/26 ,किंवा 18/18/10 ची एक गोणी खत द्या वे 

उगवण झाले वर नऊ इंचाचे पिक झाले वर शेंडे छाटणी करावी 

एक महीन्याने युरीया एकरी एक बॅग द्यावी 

     उन्हाळी चवळी वर मावा,व भुरी रोग आल्यावर औषधी फवारणी करावी 

    हिरव्या शेंगा भाजी साठी विक्री 

स्वतः करावी ऊनहाळयात भाजी पाला नसल्याने चांगला भाव मिळतो 

    चवळी पिक पंचेचाळीस दिवसात शेंगा लागुन विक्री करता येईल 

   हिरव्या शेंगा भाजी साठी विक्री न झाल्यास पक्व झालेवर शेंगा तोडुन चवळी दाणे काढुन उसळी साठी व्यापारी मागणी करतात त्याला खुप मागणी आहे 

     नसल्यास चवळी ची डाळ करुन विक्री करावी ती फायदेशीर होईल 

    


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने