ग्रॅज्युएटी,वेतन, नियमित थकीत वैद्यकीय देयके, थकीत अनुदान बाबत शिक्षण आयुक्तालयाचे परिपत्रक

 वेतन, नियमित थकीत वैद्यकीय देयके, ग्रॅज्युएटी, थकीत अनुदान बाबत शिक्षण आयुक्तालयाचे परिपत्रक.


Gajanan  

शिक्षण आयुक्तालयाने दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी शिक्षण संचालक प्राथमिक यांना एका परिपत्रकाद्वारे प्राथमिक शिक्षकांच्या दरमहा पगार व इतर बिले तसेच सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतन ग्रॅज्युएटीसाठी अनुदान प्राप्त होण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

सदर परिपत्रकानुसार नोव्हेंबर 2022 पासून ची नियमित थकीत वैद्यकीय देयके तसेच इतर थकीत देयकांसाठी अनुदान प्राप्तधन झाल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप व नाराजी झाली असले बाबत तसेच नियमित देवकांसाठी वितरित केलेले अनुदान अन्य देयके पारित करण्यासाठी वापरली जात असल्याबाबत संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी शिक्षण संचालनालय प्राथमिक स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करून क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देण्या बाबत शिक्षण आयुक्तालयाने कळविले आहे.

नोव्हेंबर 2022 पासून शिक्षकांना नियमित वेतनासाठी देखील अपुरे अनुदान प्राप्त होत आहे व त्यामुळे नियमित वेतन करणे देखील शक्य होत नाही.

याचबरोबर वेतनासाठी प्राप्त झालेले अनुदान इतर कारणांसाठी वापरल्यामुळे नियमित वेतन होण्यास विलंब होतो किंवा नियमित वेतन होत नाही अशा बाबी संघटनांच्या निदर्शनास आलेल्या आहेत.

सदर बाबती त शिक्षक संघटनेने शिक्षण आयुक्तालयाला दिलेले निवेदन आयुक्तालयाने प्राथमिक शिक्षण संचालनालय यांना अग्रेषित करून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सदर पत्रानुसार कळविले आहे.

Gajanan  



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने