योग व प्राणायाम यांचा प्रचार व प्रसार करण्यास भारत अग्रेसर.

योग व प्राणायाम यांचा प्रचार व प्रसार करण्यास विश्वगुरू भारत अग्रेसर.

__________________________________



 

 उदगीर प्रतिनिधी: प्राचीन काळापासून ते आजतागायत भारत आरोग्याच्या बाबतीत सजग असणारा देश म्हणून विश्वात ख्याती आहे.महर्षी ऋषीमुनींनी योगाभ्यासांचे धडे मानव जातीला देऊन, सुखी संपन्न व निरोगी जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. त्याच अनुषंगाने भारत हा तरुणांचा देईश म्हणून ओळखला जातो. 

योगाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून पतंजली योग समिती  उदगीर चे अध्यक्ष सुरेंद्रजी अकीणगिरे यांनी 1 जानेवारी 2023 रोजी आचार्य भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय ,जानापूर रोड,उदगीर. येथे सकाळी साडेपाच ते सात या वेळात योग वर्गाचे साधकासाठी विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.

या वर्गाला ,राष्ट्रीय कार्यकारिणीचे योग अभ्यासक, शिक्षक कार्यकारणीघ पदाधिकार्यांनी भेट दिली. त्यांच्या साक्षीने  सुभाषजी तगाळे  यांची भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय उदगीर येथील योग वर्गाचे,योगशिक्षक म्हणून सर्वानुमते नियुक्ती करुन सत्कार करण्यात आला. ते  आदर्श  माध्यमिकग शिक्षक, समाजसेवक , राष्ट्रभक्त तसेच बहुजनाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख म्हणून सुपरिचित आहेत. योग प्राणायाम चे अभ्यासक आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल साधक आणि पदाधिकाऱ्याकडून कौतुक करण्यात येत आहे.त्यांच्या या कार्याला राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत......

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने