माजी विद्यार्थी संघ सेलू
नमस्कार मंडळी,
नुकत्याच शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार संपूर्ण राज्यभरातील संपूर्ण शासकीय शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झालेले आहेत. त्या सूचनेनुसार आपल्या गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सेलू येथे देखील माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात येत आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की माजी विद्यार्थी म्हणजे नेमके कोणते विद्यार्थी? ज्यांनी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या कोणत्याही एखाद्या वर्गात शिक्षण घेतलेले असेल असे विद्यार्थी.
सदर फॉर्म भरत असताना पुढील काळजी घ्यावी.
१) सदर फॉर्म फक्त जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनीच भरावा.
२) फॉर्म एकदाच भरावा.
३) फॉर्म सबमिट केल्यानंतर सक्सेसफुल चा मेसेज येईल तेव्हा आपला फॉर्म सबमिट झाला असे समजावे.
१) फॉर्म भरताना माहिती मराठी भाषेमध्ये लिहावी.
२) फॉर्ममध्ये अंकांचे लेखन इंग्रजी भाषेमध्ये करावे.
