मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 3.0
महाराष्ट्र शासनाने मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन संपूर्ण राज्यभरात राबविण्यास सुरुवात केलेली आहे. या टप्प्यामध्ये सुरुवातीला मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळांची माहिती राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरती भरावयाची आहे नंतर सदरची माहिती ही तालुका मूल्यमापन समिती व तदनंतर जिल्हा मूल्यमापन समिती तपासणार आहेत तसेच या अभियानामध्ये प्रथम द्वितीय तसेच तृतीय क्रमांकास भरघोस असे बक्षिसाची रक्कम राज्य शासनाकडून दिली जाणार आहे. सदर अभियानाची माहिती साइटवर अपलोड करण्यापूर्वी आपणास कच्ची माहिती तयार करावी लागणार आहे त्यासाठी आपणास संबंधित अभियानाच्या माहितीची कोरी पीडीएफ उपलब्ध करून देत आहोत.
सदर अभियानाच्या माहितीची कोरी पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा.
या अभियानाची माहिती भरत असताना आपणास फोटोच्या पीडीएफ संबंधित साइटवर अपलोड करावयाचे आहेत तद्वतच संबंधित फोटो च्या हार्ड कॉफीस आपल्याला शालेय दप्तरी ठेवाव्या लागणार आहेत त्यासाठी उत्कृष्ट अशी पीडीएफ पुढे देत आहोत.
संबंधित कोरी पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये आपल्या शाळेची नोंदणी करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
