शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत बाह्य मूल्यांकनात शाळांना अ श्रेणी प्राप्त झाल्याबाबत अभिनंदन पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ : १. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र. क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४ (SSSA)
२. शासन निर्णय क. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४ (SQAAF)
३. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि.२८ जाने, २०२५
४. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा बाबतची माहिती लिंकमध्ये भरण्याबाबत पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/SQAAF/२०२४-२५/००५८२ दिनांक: ०३.०२.२०२५
५. पत्र. जा.क्र. राशैसंप्रपम//SCERT-५१.०/२९/२०२५-SSSA/१/१६,२४७७५/२०२५ दि २४/१२/२०२५
उपरोक्त संदर्भ क्र. १च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संदर्भ क्र. २ व ३ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र. ४ नुसार शाळांचे स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF टॅबवर स्वयं-मूल्यांकनासाठी scert-data.web.app ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.
उपरोक्त संदर्भ क्र ४ नुसार सन २०२४-२०२५ मध्ये राज्यातील १,०२,६७५ शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केले. संदर्भ क्र ५ नुसार सन २०२४-२०२५ मध्ये स्वयं मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांच्यापैकी सन २०२५-२०२६ मध्ये १०७१२ शाळांची बाह्य मूल्यांकन करण्यासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी १०६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण करण्यात आले.
संदर्भ क्र १ च्या शासन निर्णयातील क) प्राधिकरणाची कार्यपद्धती व कार्ये मधील मुद्दा क्र VIII मध्ये बाह्य मूल्यांकनानंतर त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनानंतर मिळालेल्या श्रेणीचा शाळेच्या दर्शनी भागात अथवा शाळेच्या लेटर हेड वर उल्लेख करावा असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार सन २०२५-२६ मध्ये बाह्य मूल्यांकन पूर्ण झालेल्या शाळांनी आपल्या शाळेला मिळालेली श्रेणी शाळेच्या दर्शनी भागात अथवा शाळेच्या लेटर हेड वर नमूद करावी.
सन २०२४-२५ मध्ये स्वयं मूल्यांकन केलेल्या व त्यापैकी सन २०२५-२६ मध्ये बाह्य मूल्यांकनासाठी निवडण्यात आलेल्या शाळांच्यापैकी ४२९ शाळांना अ श्रेणी प्राप्त झाली आहे. राज्यातील अ श्रेणी प्राप्त झालेल्या शाळांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. अशा शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिति / शाळा व्यवस्थापन व विकास समिति तसेच शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि शाळेला अ श्रेणी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन....
यापुढे या शाळांनी आपल्या शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी व इतर शाळांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा...
सोबतः अ+ श्रेणी प्राप्त करणाऱ्या शाळांची यादी
Digitally signed by HEMANT SHARACHCHANDRA VASEKAR Date: 17-02-2026 15:06:27
(डॉ. हेमंत वसेकर, भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादरः
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
